अकोले (स्वप्नील काळे) : २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट संपून आता दुसरी लाट आली आहे. पुन्हा लॉकडाऊनची वेळसरकारवट आली आहे. मात्र अजूनही नगर जिल्ह्यातील आदिवासींच्या पदरात खावटी पडली नाही. खावटी आदिवासींना कधी मिळेल असा सवाल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने यांनी केला आहे.
खावटी योजनेंतर्गत आदिवासी बांधवांना ४ हजार रुपये रकमेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी २००० रुपये रकमेचा लाभ रोख स्वरुपात तर २००० रुपयांचा लाभखाद्य वस्तू स्वरुपात देण्यात येणार होता. त्यासाठी २३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. खावटीच्या अनुषंगाने सर्वेक्षणाची प्रक्रिया आदिवासी विभागाने पारपाडली. लाभार्थ्यांच्या याद्या जाहीरझाल्या. त्यांच्याकडून कागदपत्रांचीपूर्तता करवून घेण्यात आली. मात्र खावटी काही पोहचली नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट आणखी भीषण आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. पुन्हा एकदा आदिवासी युवक बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशात या तोकड्या मदतीचीही पूर्तता होत नसेल, तर काय अर्थ? अशी संतप्त प्रतिक्रिया रामनाथ भोजने यांनी व्यक्त केली.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कागदी खेळ आणि टक्केवारीत अडकलेली खावटी योजनेचा लाभ आतापर्यंत आदिवासींना मिळाला नाही. खावटी योजनेची फसवी घोषणा करुन आदिवासींच्या तोंडाला पाने पुसली आहे.
आदिवासी मंत्र्यांनी केलेल्या घोषणेला एक वर्ष पूर्ण होण्यास १५ दिवस शिल्लक आहे व कोरोनाची दुसरी लाट भयानक रुप घेत आहे.अद्याप लाभार्थी यादी पूर्ण झाली नाही, बँक डिटेल प्राप्त नाही, अनेक कुटुंबाकडेजातीचे दाखले, बँक खाते नाही त्यामुळे ३ महिने लाभ देणे शक्य नाही. २००० रुपयांचे धान्य देण्याचे ठरले पण अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण नाही, आता२००० रुपयाची घोषणा केली पण जुनीच तरतूद पूर्ण झाली नाही, असे रामनाथ भोजने म्हणाले.
संपादन : अशोक मुरुमकर