करमाळा (सोलापूर) : ठरवलं तर अशक्य काहीच नसतं. याची अनेक उदाहरणे आहेत त्यातीलच एक म्हणजे डॉ. अपर्णा महेश भोसले! आरोग्यक्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली आणि त्या या क्षेत्रात आल्या. ठरवूनच मी हे क्षेत्र निवडले मात्र डॉक्टर झाले नसते तरी आरोग्य क्षेत्रातच काम केले असते असे त्या सांगत आहेत. फॅमिली फिजिशियन म्हणून करमाळ्यात त्या कार्यरत आहेत. केमिस्ट भवन समोरील भोसले ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ञ व जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. महेश भोसले यांच्या मार्गदेशनाने त्या काम करत आहेत.
डॉ. भोसले यांचे माहेर परभणी आहे. स्वतः चा निश्चिय, भावाची प्रेरणा आणि आईच्या इच्छेमुळे अपर्णा भोसले झाल्या डॉक्टर आहेत. त्या म्हणत आहेत मला लहानपणापासूनच आरोग्य क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. त्याच दृष्टीने मी अभ्यास करत गेले. डॉक्टरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देत त्या सामाजिक कामातही अग्रेसर असतात. हाडांचे आजार असलेल्या रुग्णांना पती डॉ. महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाने त्या सामोपदेशनही करतात. अतिशय सोप्या आणि रुग्णांना समजेल अशा भाषेत त्या सल्ला देतात. हाडांबाबत आजार असेल तर डॉक्टरांचाच सल्ला घेणे आवश्यक आहे. काहीजण बाहेर उपाय करतात मात्र प्रत्येक रुग्णाला ते लागू होतील याची खात्री नसते. हा दीर्घकाल उपचार नाही, त्यातून भविष्यत त्रास निर्माण होऊ शकतो, असे त्या म्हणत आहेत.

डॉ. भोसले या होमीओपॅथिक विभागातील आहेत. मात्र त्या हाडाच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांना सुरुवातीपासून आरोग्य विभागात काम करण्याची आवड होती. आपण कोणत्याच क्षेत्रात मागे राहू नये म्हणून त्या प्रयत्न करत होत्या. त्यातून प्रॅक्टिस करत असताना त्या हाडांच्या विभागात गेल्या आणि त्याच विभागात काम करू लागल्या. त्यांचा मावस भाऊ सर्जन आहे. त्याचीच प्रेरणा घेऊन डॉक्टर झाल्या. त्यांच्या आईची इच्छा त्यांनी डॉक्टर व्हावे, अशी होती. वडील ट्रेजरी विभागात होते. आई गृहिणी आहेत.

डॉ. भोसले म्हणाल्या, अपघात झाल्यानंतर रुग्ण येतात. तेव्हा सर्वजण घाबरलेले असतात. त्यानं समजावून सांगणे त्यांना आवरणे हे अवघड असते. अशावेळी त्यांना समजावून सांगत रुग्णावर उपचार करण्यालाच प्राधान्य द्यावे लागते. करमाळा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील अभावाबाबतही त्यांनी परखडपणे मत मांडले आहे. तत्काळ सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

भोसले ऍक्सिडेंट हॉस्पिटल ऍडव्हान्स ऑर्थोपेडिक ट्रामा अँड जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर येथील सुविधांबाबत सांगताना त्या म्हणाल्या, येथे एक्सरे, सी आर्म, फिजिओथेरपी (भौतिक उपचार), सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फॅक्चर ऍक्सीडेन्ट, अस्थिरोग सांधेरोग, पाठीच्या मणक्याचे आजार, हाडाचे कॅन्सर, कॉम्प्लेक्स ट्रामा व फॅक्चर मॅनेजमेंट, लहान मुलांच्या हाडांचे व्यंगोपचार, गुडगा व कमरेच्या खुब्याची सांधेरोपण शस्र्रक्रिया, गुडघ्यामधील व खाद्यामधील लिगामेंट दुर्बिणीच्या साहाय्याने वबदलणे व दुरुस्ती करणे असे उपचार येथे केले जातात. यावेळी भोसले यांनी मान दुखी, गुडघे दुखी व पाठ दुखी याबाबतही मार्गर्शन केले आहे.