Video : करमाळा शहर व ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन ‘सरकार’च्या माध्यमातून घेतला सामाजिक वसा

The youth of Karmala city and rural areas came together and took social welfare through Sarkar mitra mandal

करमाळा (सोलापूर) : मित्र मंडळ म्हटलं की ते कोणत्या भागातील, गल्लीतील असेल असा प्रश्न पडतो. पण करमाळा शहरात असे एक मंडळ आहे की त्याला कोणतीही गल्ली किंवा चौक नाही. करमाळा शहर व ग्रामीण असं कार्यक्षेत्र असलेले हे मंडळ आहे. समाजातील सर्व जाती, धर्म, पंथ या घटकांना बरोबर घेऊन जाणारे ते मंडळ आहे. त्या मंडळाचे नाव आहे सरकार!
Video सर्वधर्मसमभावचे दर्शन! करमाळा शहरात साधारण ५०० मीटरवर असलेल्या सहा ‘श्रध्दास्थाना’मध्ये होतोय गणेशोत्सव

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने करमाळ्यात सर्व भागातील व क्षेत्रातील तरुणांनी एकत्र येऊन १७ वर्षांपूर्वी या मंडळाची स्थापना केली. सर्वधर्मातील तरुण यामंडळात आहेत. सर्वांच्या सुखदुःखात ते सहभागी होतात. सर्व उत्सव, जयंती ते साजरा करतात. याशिवाय आपण समाजाचे काही तरी देणे लागतो जणू हाच संकल्प करून मंडळाच्या वतीने वर्षभर कार्यक्रम राबवले जातात.

सरकार मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशोत्सवात दरवर्षी वेगवेगळा अध्यक्ष नेमला जातो. जय महाराष्ट्र चौक येथे दरवर्षी प्रतिष्ठापना केली जाते. त्यात सर्व समाजाला स्थान दिले जात आहे. करमाळ्यात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी मुली येतात. त्यांच्या संरक्षणासाठी हे मंडळ काम करत आहे. सर्व महाविद्यालये पोलिस यांच्याशी समन्व्य ठेवला जातो. गैरवर्तनाचे प्रकार होऊ नयेत म्हणून पालकांच्या तक्रारीवरून मंडळाने ‘नो स्कार्प’ असे पत्रक काढले होते. तेव्हा तत्कालीन पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, बिपीन हसबनीस, राजेंद्र देवरे यांनीही त्याला प्रतिसाद दिला होता. महाविद्यालयानेही याचे स्वागत करत मुलींच्या संरक्षणासाठी मंडळातील सदस्य हा भाऊ म्हणून पुढे आला होता.
Video : मुलं दत्तक घेऊन जपली सामाजिक बांधिलकी! १९६५ पासून एकदाही अध्यक्ष न नेमलेले करमाळा शहरात गणेशोत्सव मंडळ

कोरोना काळात या मंडळाने गरजुंना मदत केली. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवात हुतात्मा झालेल्या वारसाच्या हस्ते ‘श्री’ची आरती घेतली जाते. याशिवाय समाजातील वंचित, दुर्बल व दुर्लक्षित घटकांनाही आरतीचा मान देऊन सन्मान दिला जातो. वकील, डॉक्टर, व्यापारी यांच्यासह राजकीय क्षेत्रात काम करणारी मंडळी या मंडळात सहभाग घेते. मंडळाच्या कामात राजकीय जोडे बाजूला ठेऊन सामाजिक हित डोळ्यासमोर ठेऊन या मंडळातील सदस्य काम करत आहेत.

या मंडळामध्ये सचिन घोलप, सचिन गायकवाड, विजय लावंड, अमोल यादव, राहुल पवार, विजय घोलप, अरुणकाका जगताप, स्वानंद वांगडे, विनय ननवरे, संतोष वारे, ॲड. सुनील घोलप, ॲड. अमर शिंगाडे, प्रशांत ढाळे, शायर बागवान, सुनील जाधव, जोतिराम लावंड, अमोल कांबळे, विशाल गुळवे, चंद्रकांत चोरमले, विशाल राठोड, दत्तात्रय भांडवलकर, अजित यादव, अशोक चव्हाण, सुरज वांगडे, विनोद महानवर, दादा इंदलकर, जयसिंह सालगुडे, मोहन जगदाळे, विशाल माळवे, चंद्रकांत शिंदे, अतिश दोशी, असिर खान, महेश दिवाण, कांतीलाल नवले, सातव सर, विवेक सोनी, संदीप चुंग, संतोष लाड, संतोष सापते, साजिद बागवान, आनंद शहा, बाप्पु शिरगिरे, माऊली कदम, पप्पू यादव, विशाल घोलप, राहुल यादव, सोनु यादव, सुहास माने, भगत गुरु, मयूर देवी, शिवराज ननवरे, राहुल वनारसे, प्रमोद भाग्यवंत, संभाजी होनप, अमोल मुनोत, गोपीनाथ देवी, संदीप पवार, राजु तांबोळी, दीपक गायकवाड आदी सदस्य काम करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *