करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील झरे येथे एका घरातून दरवाजाचा कडी कोयंडा तोडून प्रवेश करत चोरट्याने रोख रक्कम, सोन्याचे दागिने व कागदपत्रे लंपास केली आहेत. यामध्ये अनोळखी चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ३० जुलैला हा प्रकार घडला असून अंकुश महादेव मिटे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

मिटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ‘माझ्या शेतीमध्ये दोन खोल्या आहेत. त्यामध्ये आम्ही राहत नाहीत. मात्र त्यात संसार उपयोगी व शेती उपयोगी साहित्य तसेच टीव्ही, लोखंडी कपाट असे साहित्य आहे. 29 जुलैला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेतात असणाऱ्या दोन खोल्या कुलूप लावून गावात घरी निघून गेलो. त्यानंतर ३० तारखेला दुपारी ४ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात गेलो.

तेव्हा दोन खोल्यांमध्ये किचनच्या खोलीचा कोयंडा तोडलेला दिसला. त्यानंतर किचनमध्ये जाऊन पाहिले तर किचनमधील संसार उपयोगी साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. याबरोबर बेडरूमचा दरवाजा उघडलेला दिसला. बेडरूममधील लोखंडी कपाट उघडून ड्रावरमध्ये ठेवलेले साडेचार हजार रुपये रोख, दोन सोन्याचे कर्णफुले व साड्या याबरोबर विठ्ठल रुक्माई देवस्थान ट्रस्टची पिशवीतील कागदपत्रे चोरट्याने लंपास केल्याचे दिसले. यामध्ये सुमारे 9900 रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
करमाळा पंचायत समितीचे आरक्षण बदलणार का? ५ तारखेला फैसला
एकापेक्षा जास्त मतदारसंघात मतदान करणारांवर बसणार आळा; सोमवारपासून राबवली जाणार विशेष मोहीम
सुनील सावंत आक्रमक! तुंबलेली गटार त्वरित काढा, अन्यथा हेच पाणी पालिकेत टाकू
नातवाची आजोबाला दगडाने मारहाण जावईला चावा; आळजापूर येथील एकाविरुद्ध गुन्हा

