करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराचा पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झाला आहे. दोन दिवसांपूर्वी जेऊरजवळ जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून सिद्धार्थनगर भागातील नागरिक करमाळा पंचायत समितीमधून विकत पाणी नेहत आहेत. पाच रुपयांचा कॉइन टाकून साधारण दीड हंडा पाणी मिळत आहे. पाण्यासाठी हा भुर्दंड पडत असून नगरपालिकेने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी महिला करत आहेत.
