करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था निवडणुकीत १३ पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. सुरेखा खोबरे, सुवर्णा बोराडे व वैभव माने अशी बिनविरोध झालेल्या संचालकांची नावे आहेत. १० जागांसाठी निवडणूक लागली असून २२ फेब्रुवारीला मतदान होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एन. माने यांनी दिली आहे.
करमाळा तालुका जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्थात १४१ सभासद आहेत. यामध्ये १३ जागांसाठी ३४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १७ जणांनी माघार घेतली आहे. पोपट फरतडे, मारुती कन्हेरे, मंगेश झोळ, शिवाजी खंडागळे, जगन्नाथ भिसे, दादासाहेब केवारे, कुलदीप दौड, दत्तात्रय सुतार, सूर्यकांत मोहिते, सुशेन ननवरे, दत्तात्रय शिंदे, नितीन आल्हाट, दत्तात्रय जाधव व दत्तात्रय सुतार यांच्यात ही लढत लागली आहे.