मुंबई : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण खेकड्यामुळेच फुटले आहे. यावर मी आजही ठाम आहे असा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी सावंत यांना विचारलेल्या प्रश्नावर मंत्री सावंत यांनी स्पष्टीकरण दिले.

‘तुम्ही मागील सरकारने काय केले? असे विचारतात, पण त्यातील निम्मे मंत्री तुमच्याकडेच आहेत’ असे बोलत समोर बसलेल्या मंत्री सावंत यांच्याकडे बघून खेकड्यामुळे धरून फुटले तुम्हाला खेकड्यावर काय सांगायचे आहे का? मला त्या खेकड्याबाबत ऐकायचे आहे, असे आमदार खेडचे म्हणाले. त्यावर मंत्री सावंत म्हणाले, ‘मी इंजीनियरिंगचा विद्यार्थी आहे. चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले तेव्हा मी तांत्रिकदृष्ट्या त्यावर भाष्य केले होते. मात्र माध्यमांनी व विरोधकांनी त्याचा विपर्यास केला.’

मंत्री सावंत म्हणाले, ‘मी आजही त्यावर ठाम आहे’ असे म्हणत मंत्री सावंत म्हणाले, ‘उन्हाळा वाढत जातो तसे खेकडे ओल असेल तिकडे बिळे करत खोल जातात. पावसात अथवा ढगफुटीमुळे प्रचंड दबावाने पाणी आल्याने त्या बिळातून ते खाली जाते आणि त्या दबावाने बांध फुटतो हे तांत्रिक कारण आहे. मेरीच्या अहवालात ते आहे मी तेव्हाही असे होऊ शकते म्हणालो होतो. मात्र माध्यमांनी व विरोधकांनी त्याचा विपर्यास केला. मी आजही त्यावर ठाम आहे, असे मंत्री सावंत यांनी सांगितले.

