करमाळा (सोलापूर) : कोरोनानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे. त्यातूनच आज (गुरुवारी) प्रमुख मंडळांकडून देखावे सादर केले जाणार आहेत. नागरिकांनी याचा शांततेत लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या देखाव्याचे काल (बुधवारी) उदघाटन झाले. आज राशीन पेठ तरुण मंडळ, हिंदू- खाटीक तरुण मंडळ, दत्त पेठ तरुण मंडळ, कानाड गल्ली येथील महर्षी वाल्मिकी मित्र मंडळ आदी मंडळांचे देखावे असणार आहेत.