करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात ८६ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील ८४ जणांचा सामावेश आहे. एकुण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ४७५९ झाली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, करमाळा तालुक्यात आतापर्यंत कोरोनाने ८० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ग्रामीण भागातील ६१ तर शहरातील १९ जण आहेत. पॉझीटीव्ह रुग्णांमध्ये शहरातील ११९५ तर ग्रामीण भागातील ३५६४ जण आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३७९४ असून ८८५ जणांवर उपचार सुरु असल्याचे डॉ. जाधव यांनी म्हटले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर