करमाळा (सोलापूर) :
डॉ. कांबळे म्हणाल्या, प्रसूती होताना रुग्णाला वेदना होतात. त्यामुळे सीजरचे प्रमाण वाढते. वेदना सहन न झाल्याने रुग्णाची व नातेवाईकांची मानसिकता सीजर करावे अशी होते. मात्र सीजर न करता करमाळ्यात एका ३२ वर्षाच्या रुग्णाची प्रसूती करण्यात यश आले आहे. सध्या अनेक रुग्णाची विवाह लवकर होण्यामुळे १९ ते २० वर्षात प्रसूती होते. मात्र वेदना सहन करण्याची त्यांच्यात क्षमता नसते. किंवा काही शारीरिक बाबींमुळे प्रसूतीवेळी त्या त्रास सहन करत नाहीत. अनेकदा डॉक्टरांना सीजर करावे लागते. मात्र आता अशा स्थितीत सीजर न करताही प्रसूती करता येऊ शकणार आहे. तशी सुविधा करमाळ्यात उपल्बध झाली आहे. त्यातून गरज पडली तर ऐनवेळी सिजरीही करता येऊ शकणार आहे.

डॉ. कांबळे म्हणाल्या, भूलतज्ञ डॉ. बंडगर- पाटील व डॉ. शिंदे हे करमाळ्यात असणार आहेत. त्यामुळे ‘एपिड्युरल कॉनेला’ इंजेक्शनमुळे वेदना न होता प्रसूती होते. त्यासाठी भूलतज्ञन डॉक्टर उपलब्ध असणे आवश्यक असते. या इंजेक्शनमुळे वेदनाहीन प्रसूती होते. त्याचा भविष्यात शरीरावरही काहाही परिणाम होत नाही. (अपवादात्मक एखाद्या रुग्णाला कंबर दुखी होऊ शकते.)

एखाद्या रुग्णाची पहिली प्रसूती सीजर असेल तर दुसरी प्रसूतीही सिजरच केली जाते. मात्र आता तसे करण्याची आवश्यकता असणार नाही. वेदना न होता नॉर्मल प्रसूती केली जाऊ शकणार आहे. यामुळे रुग्णाच्या पैशाचीही बचत होणार आहे. अनेकदा रुग्णाला प्रसूतीचा त्रास होऊ लागल्यानंतर चीडचीड होते. त्यामुळे नातेवाईकही घाबरतात. अशावेळी सीजर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशावेळी भूलतज्ञ उपलब्ध झाले नाही तर अडचण येते. मात्र आता करमाळ्यात कायम भूलतज्ञ असणार आहेत. त्यामुळे ‘एपिड्युरल कॉनेला’ इंजेक्शन देऊन प्रसूती करता येणार आहे.

कांबळे हॉस्पिटलमध्ये काल प्रसूती झाली तेव्हा भूलतज्ञ डॉ. बंडगर- पाटील यांच्यासह डॉ. कांबळे, सिस्टर सारिका कांबळे, माधुरी दळवी व ज्योती दिवाण उपस्थित होते. प्रसूती झाल्यानंतर रुग्ण अतिशय व्यवस्थितपणे आहे. त्याची हालचाल व्यवस्थित आहे. इतर प्रसूतीवेळी जी काळजी घेतली जाते तीच काळजी रुग्णाने घेणे आवश्यक असल्याचे डॉ. काबंळे यांनी सांगितले आहे.