करमाळा (सोलापूर) : ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत श्री देवीचामाळ येथील खंडोबा मंदिर परिसरात बुधवारी (ता. १०) वृक्षारोपण करण्यात आले. करमाळा पोलीस व करमाळा होमगार्ड पथक यांच्या वतीने हे वृक्षारोपण करण्यात आले. दादाश्री फाऊंडेशन व श्री देवीचामाळ ग्रामपंचायत यांनी या वृक्षारोपणासाठी सहकार्य केले आहे.

या वृक्षारोपणावेळी करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, करमाळा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. यू. जाधव, करमाळा बसस्थानकाच्या आगारप्रमुख अश्विनी किरगत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, करमाळा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचे अशोक मुरूमकर, दादाश्री फाऊंडेशनचे काकासाहेब काकडे, श्री देवीचामाळ ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सोरटे आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार सचिन जेव्हेरी यांनी वृक्षारोपणाबद्दल माहिती सांगितली. त्यानंतर काकडे, चिवटे, सोरटे व पोलिस निरीक्षक कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले. सोरटे यांनी उन्हाळ्यात येथे वृक्ष जळू नयेत म्हणून ठिबक केले जाणार असल्याचे सांगितले. तर चिवटे यांनी येथे ऑक्सिजन पार्क व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कोकणे यांनी वृक्षारोपणाची माहिती सांगत कर्माला शहर नैसर्गिक दृष्ट्या कसे चांगले आहे, याची माहिती सांगितली.



