केत्तूर (अभय माने) : करमाळा (सोलापूर) तालुक्याच्या पश्चिम भागात बुधवारी (ता. ३) विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वेळी कात्रज येथील महेश तानाजी लकडे यांच्या गोट्यासमोर झाडावर वीज पडल्याने झाडाखाली बांधलेल्या एका जर्सी गाईचा मृत्यू झाला आहे.
Video : वारे यांच्या प्रयत्नाला यश; कामोणे तलावात कुकडीचे पाणी दाखल होताच पूजन
बुधवारी ४ वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाने या भागात पावसाने हजेरी लावली. लकडे यांनी आपल्या पाच गाई गोट्यासमोरील झाडाशेजारी बांधल्या होत्या. या ठिकाणी वीज पडून जरशी गाय ठार झाल्या. सदर गाय आठ महिन्याची गाभण होती.
Video : ‘मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा मिळत असल्याने सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे भगवे उपरणे पांघरून सामंत यांच्या गाडीवर हल्ला’
लकडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. मृत झालेल्या जरशी गाईची किंमत साधारण 80 हजार आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा करून भरपाई देण्याची कारवाई करावी, अशी मागणी लकडे यांनी केली आहे. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर केत्तूर, पारेवाडी, पोमलवाडी, खातगाव, गवळवाडी, टाकळी, राजुरी, वाशिंबे, सोगाव परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.