सोलापूर : कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लावण्यात आलेली संचारबंदी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमुळे सोलापूर जिल्हा व शहरात शुक्रवारी (ता. १६) सकाळपासून शिथील करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दिली आहे.
शनिवारी (17 एप्रिल) पंढरपूर मतदारसंघासाठी मतदान होत आहे. मतदान करण्यासाठी मतदारांना जाणे येणे सुलभ व्हावे यासाठी 16 एप्रिलच्या सकाळी ७ वाजल्यापासून 18 एप्रिल 2021 सकाळी ८ वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात संचारबंदी शिथील असणार आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. मात्र मतदारांना येणे जाणे सोयिस्कर व्हावे, निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी होता यावे, यासाठी या संचारबंदी मध्ये शिथीलता देण्यात येत आहे. मात्र या काळात जमाबंदीचे आदेश कायम राहणार असल्याचे जिल्हाधीकारी शंभरकर यांनी सांगितले आहे.
जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदारसंघातील नसलेल्या राजकीय व्यक्तिंना मतदार संघाबाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर