करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जेऊरमधील लव्हे रस्ता परिसरात घरासमोर उभा केलेल्या टिपरच्या दोन बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणात तीन अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गणेश श्रीकृष्ण कांबळे (वय २५, रा. जेऊर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझा टिपर मित्र दीपक महादेव रासकर यांच्या घरासमोर उभा केला होता. सोमवारी (ता. ८) पहाटे दीड वाजताच्या सुमारास एका मोटारसायकलवर अनोळखी तिघेजण आले. त्यांनी अंधाराचा फायदा घेऊन टिपरमधील दोन बॅटऱ्या काढून नेल्या, असे मित्र रासकर याने सांगितले. याची किंमत १८ हजार होती.




