सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत नेतृत्वाखाली तालुक्यातील रखडलेले प्रश्न सोडवा : सावंत

Under the leadership of Public Health Minister Tanajirao Sawant resolve the outstanding issues in the Karmala taluk

करमाळा (सोलापूर) : सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील रखडलेले प्रकल्प प्रश्न सोडविण्यासाठी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भैरवनाथ शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक किरण सावंत यांनी केले.

मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर भैरवनाथ कारखान्याच्या वतीने चिवटे यांचा कारखाना स्थळावर सत्कार झाला. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर रविराज भोसले, शेतकी अधिकारी प्रसन्न कांबळे, वसुली अधिकारी बबन चांदगुडे, हार्वेस्टर इन्चार्ज शंकर कुडाळ, लेबर ऑफिसर जितेंद्र चांदगुडे, सिद्धेश्वर मस्कर, कृषी विकास अधिकारी श्री. गायकवाड, श्री. जाधव, पुरवठा अधिकारी श्री. चव्हाण, चीफ केमिस्ट श्री. जाधव, भगवान सानप, पप्पू सूर्यवंशी, अनिल पाटील, विनोद महानवर उपस्थित होते.

सावंत म्हणाले, भैरवनाथ कारखान्याच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मदत झाली आहे. येणाऱ्या काळात सात लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे नियोजन आहे. चिवटे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य मंत्री सावंत, प्रा. शिवाजीराव सावंत, माजी आमदार नारायण पाटील यांनी विश्वास टाकला आहे त्याला पात्र राहून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *