उमरड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लालासाहेब पडवळे यांची बिनविरोध निवड

Unopposed election of Lalasaheb Padwale as Sarpanch of Umrad

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उमरड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लालासाहेब नामदेव पडवळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमरड येथील ग्रामपंचायतचे सरपंच पद रिक्त होते. त्यामुळे येथे निवडणूक झाली. त्यात सरपंच पदासाठी पडवळे यांचा एकच अर्ज आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी एस. आय. काझी यांनी काम पहिले. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून समाधान वलटे यांनी सही केली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी सई अडगटाळे यांनी काम पाहिले. पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रमोद गवळी यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बदे, दत्तात्रेय बदे, बापूराव चोरमले, मुकेश बदे, संदीप बदे, समाधान वलटे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *