वैभव पोळ यांची महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड

Vaibhav Pol has been elected as Karmala Taluka President of Maharashtra State Banana Farmers Association

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शेटफळ येथील वैभव पोळ यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण व राज्य उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव यांनी दिले आहे. केळी पिकामध्ये केलेले विविध प्रयोग व केळी उत्पादक विषयी असलेली तळमळ आणि त्याविषयी केलेल्या कामाची दखल घेऊन पोळ यांची महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *