करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात (वायसीएम) विविध कार्यक्रमांनी देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १३, १४ व १५ ऑगस्टला विविध कार्यक्रम झाले. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने, प्राचार्य जयप्रकाश बिले आणि प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील यांच्या हस्ते व महाविद्यालयाच्या एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांसमवेत स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यात आले.

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, खजिनदार गुलाबराव बागल, विश्वस्त आशूतोष घुमरे, अॅड. विक्रांत घुमरे, चंद्रशेखर शीलवंत, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कॅप्टन संभाजी किर्दाक व लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड उपस्थित होते.

१३ तारखेला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचार्यांनी राष्ट्रध्वज घेवून शहरातून काढलेल्या प्रभातफेरीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. करमाळ्याचे तहसीलदार समीर माने, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, गटविकास अधिकारी मनोज राऊत आदींनी सहभाग घेतला होता. महविद्यलयामध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि वृक्षारोपण हे उपक्रम राबविण्यात आले.

महाविद्यालय आणि करमाळा तहसील कार्यालय यांच्या वतीने तालुक्यातील २६ गावांमध्ये विद्यार्थ्यांनी वासुदेवाची वेशभूषा करून सकाळच्या प्रहरी गावातील नागरिकांना राष्ट्रधजाचे महत्त्व व आचारसंहिता समजावून सांगितली. वासुदेवांच्या या नाविन्यपूर्ण सादरीकरणास करमाळा शहर आणि तालुक्यातून प्रतिसाद मिळाला. प्रा. लक्ष्मण राख यांनी हा उपक्रम राबविला. हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रा. से. यो. चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे, प्रा. सुधीर मुळीक, कार्यालयीन अधीक्षक संगीता नाईक यांनी परिश्रम घेतले.
