करमाळा (सोलापूर) : संगोबा येथे श्री आदिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात. संगोबा हे तीर्थक्षेत्र सीना व कान्होळा नदीच्या संगमावर आहे. येथे अंतविधीनंतरचा दाहावा व इतर धार्मिक विधी मोठ्या प्रमाणात होतात. दर्शनासाठीही येथे मोठ्याप्रमाणात भाविक येतात. भक्तांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागते.
पोथरे, निलज ग्रामपंचायतअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाणी फिल्टरचे मशीन बसवण्यात आले. परंतु सात महिन्यापासून संगोबा, निलज, पोथरे येथील आरो फिल्टर टोकन टाकून देखील अर्धा लिटरसुद्धा पाणी मिळत नाही. संबधीत आरो फिल्टरची मिशनरी देखील निकृष्ट दर्जाची आहेत. यामध्ये ठेकेदाराने मोठा गैरव्यहावर केला असून यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. आठ दिवसांच्या आत आरो पाणी फिल्टर सुरु न झाल्यास आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी दिला आहे.