करमाळा (सोलापूर) :
शिवसेनेतील शिंदे समर्थकांच्या लेटरपॅडवरून ठाकरे पिता-पुत्रांचे फोटो गायब; फलकावर मात्र फोटो असल्याने रंगली चर्चा

करमाळा शहरात रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास पाऊस सुरु झाला होता. काही वेळातच या पावसाने शहरातील सर्व रस्ते जलमय झाले. पावसाचे जोर वाढल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व खंदक रोड या भागातील रस्ते पाणी खाली गेले. भवानीनका परिसरात सुमारे फूटभर पाणी साचले होते. हा पाऊस सुरु असताना एसटी स्टॅन्ड, कसाब गल्ली, बारा बंगला भागातून फंड गल्लीत पाणी आले. गटारांमध्ये हे पाणी न बसल्याने रस्त्यावर आले.
Video : वारे यांच्या प्रयत्नाला यश; कामोणे तलावात कुकडीचे पाणी दाखल होताच पूजन

पावसाचा जोर जास्त असल्याने मोठयाप्रमाणात पाणी आले होते. त्यातच काही ठिकाणी गटार तुंबली असल्याने शेजारील नागरिकांच्या घरात पाणी घुसले. संतोष जाधव यांच्यासह या भागातील काही नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. यावर नाराजी व्यक्त करत नालेसफाई व्यव्यस्थित न झाल्यानेच घरात पाणी घुसल्याचा आरोप केला जात आहे.
Video : मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा मिळत असल्याने सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे भगवे उपरणे पांघरून सामंत यांच्या गाडीवर हल्ला

