करमाळा तालुक्याच्या राजकारणातील एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी एकत्र आले आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी दोघांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप दोघांचाही एकत्रित दौरा पहाणी दौरा झालेला नाही. गेल्या अपवाद सोडला तर काही दिवसांपासून आदिनाथसाठी झालेल्या बैठकितही ते दोघे एकत्र दिसलेले नाहीत. माजी आमदार पाटील यांनी मंत्री तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार बागल व पाटील गटाचे संचालक एकत्र काम करतील असे जाहीरपणे सांगितले. मात्र बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. माध्यमांपासून सध्या त्या लांब आहेत.
आदिनाथ कारखान्याचे न्यायालयीन प्रकरण सुरु असताना मंत्री सावंत यांनी केलेल्या मदतीमुळे माजी आमदार पाटील यांनी पुढाकार घेऊन कारखाना सुरु करण्यासाठी पाऊल उचलले आहे. कारखान्यावर बागल गटाची सत्ता असल्याने त्यांनीही यामध्ये सहभाग घेतला असल्याचे सांगितले जाते. मात्र पाटील व बागल हे अद्याप कारखान्यासाठी एकत्रित दिसले नाहीत. मंत्री सावंत यांच्याबरोबर पुण्यात झालेल्या भेटीचा त्याला अपवाद आहे.
कारखाना सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले तेव्हा बागल गटाच्या संचालकांनी बैठक बोलावली होती. बागल यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला पाटील गटाचे संचालक नव्हते. त्यानंतर आदिनाथ कारखान्यावर अभिषेक करण्यात आला होता. तेव्हा माजी आमदार नारायण पाटील उपस्थित होते तर बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यावेळी उपस्थित नव्हत्या. तेव्हाच माजी आमदार पाटील यांनी मंत्री सावंत यांच्या सूचनेनुसार बागल व पाटील हे आदिनाथसाठी एकत्र काम करतील. यापुढे अनेक बैठका होणार आहेत. तेव्हा बागल व पाटील एकत्र बैठकांना दिसतील असे सांगितले होते.
त्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर माजी आमदार पाटील यांनी आदिनाथ कारखान्यावर जाऊन कामाची पहाणी केली होती. तेव्हाही बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल उपस्थित नव्हत्या. दरम्यान पुण्यात मंत्री सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीवेळी बागल व पाटील एकत्र दिसले होते. तेव्हा ‘काय सांगता’ने बागल यांना संर्पक साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नव्हता.

गेल्या आठवड्यात (गुरुवारी) आदिनाथ कारखान्याचा ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने संचालक मंडळाच्या ताब्यात दिला. तेव्हाही बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल या कारखान्यावर आल्या नव्हत्या. तेव्हा कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे हे एकटेच उपस्थित असल्याने पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, अशी माहिती समजत आहे. पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनीही कारखान्याची पहाणी केली.

आदिनाथ बाबत बागल गटाची नेमकी काय भूमिका आहे हे अद्याप नेत्या रश्मी बागल यांनी जाहीर केलेली नाही. अनेकदा ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने त्यांच्याशी संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी फोन उचललेला नाही. बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनीही ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना त्यांची भूमिका मांडलेली आहे. माजी आमदार पाटील, हरिदास डांगे यांनी भूमिका स्पष्ट केल्या आहेत. मग बागल या भूमिका स्पष्ट का करत नाहीत? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

बागल यांनी शनिवारी (काल) कारखान्याची पहाणी केली असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. माजी आमदार पाटील यांनी सांगितल्यानुसार मंत्री सावंत यांनी बागल व पाटील यांना आदिनाथसाठी एकत्र काम करण्याचे सांगितले आहे. असे असताना कारखाना कार्यस्थळावर बागल आणि पाटील अद्याप एकत्र दिसले नाहीत. किंवा माध्यमांपर्यंत तशी माहितीही आलेली नाही. कारखाना सुरु व्हावा म्हणून पाटील यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून पाहणीही सुरु आहे. आता बागल यांनीही पहाणी केली आहे. पण त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नागरिकांमध्ये याबाबत उलटसुलट चर्चा आहे. बागल या या कारखान्याच्या संचालक आहेत. त्या बागल गटाच्या नेत्या आहेत आहेत. त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.
मंत्री सावंत यांनी सांगितल्यानुसार बागल व पाटील हे कारखान्यासाठी एकत्र काम करत आहेत. पण आतापर्यंत त्यांनी स्वतंत्रपणे पहाणी केली आहे. यापुढे तरी ते एकत्र पहाणी करणार आहेत का? हे पहावे लागणार आहे. याबरोबर बागल या त्यांची भूमिका माध्यमांसमोर कधी मांडणार आहेत हे पहावे लागणार आहे.