करमाळा पंचायत समितीचे आरक्षण बदलणार का? ५ तारखेला फैसला

Probable candidates from 12 constituencies of Karmala Panchayat Samiti

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या १२ गणासाठी गुरुवारी (ता. २८) आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जाती (एससी), महिला, नागरिकाचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असे आरक्षण काढण्यात आले होते. त्यात एससी सर्वसाधारण व एससी महिला या प्रवर्गासाठी दोन गण राखीव ठेवण्यात आले होते. तर ओबीसी महिलेसाठी दोन व ओबीसी सर्वसाधारणसाठी एक गण राखीव ठेवण्यात आला होता. मात्र त्यातील एका गणावर आक्षेप घेण्यात आला असून आरक्षण बदलून मिळणार का? हे पहावे लागणार आहे.

करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांच्या उपस्थितीत तहसीलदार समीर माने यांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार हे आरक्षण जाहीर केले होते. नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यावेळी उपस्थित होते. या आरक्षणावर २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत आक्षेप घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानुसार एका गणातील आरक्षणावर करमाळा तहसील कार्यालयाकडे चार आक्षेप आले आहेत.

असे जाहीर झाले होते आरक्षण
१) रावगाव : सर्वसाधारण, २) पांडे : सर्वसाधारण महिला, ३) हिसरे : सर्वसाधारण, ४) वीट : ओबीसी महिला, ५) कोर्टी : सर्वसाधारण महिला, ६) केत्तूर : सर्वसाधारण, ७) चिखलठाण : सर्वसाधारण महिला, ८) उमरड : एससी महिला, ९) जेऊर : ओबीसी सर्वसाधारण, १०) वांगी : एससी सर्वसाधारण, ११) साडे : सर्वसाधारण व १२) केम : ओबीसी महिला असे

या गणातील आरक्षणावर आला आक्षेप?
करमाळा पंचायत समितीच्या जाहीर झालेल्या १२ गणांपैकी एका गणातील आरक्षण बदलण्यात यावे असा आक्षेप घेण्यात आला आहे. तो गण एससी सर्वसाधारण वांगी असे पडले असून येथील आरक्षण बदलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सचिन पिसाळ, संजय गुटाळ, शिवराज रोकडे यांच्यासह आणखी एका व्यक्तीने आक्षेप घेतला आहे.

या तारखेला होणार निर्णय?
करमाळा पंचायत समितीच्या आरक्षणावर चौघांनी आक्षेप घेतला आहे. त्यावर ५ ऑगस्टला निर्णय होणार आहे. वांगी येथील गणात एससी सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र ते आरक्षण बदलून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथील आरक्षण बदलून दिले जाणार का? हे पहावे लागणार आहे. जर येथील आरक्षण बदलले तर इतर ग्णावर त्याचा परिणाम होणार का? हेही पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *