केत्तूर (अभय माने) : मध्य रेल्वेच्या सोलापूर- पुणे लोहमार्गावरील पारेवाडी (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. येथे रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम काही दिवसापासून वेगाने सुरू आहे. या कामाच्या दरम्यानच पारेवाडी येथील रेल्वेगेट नंबर 28 हे मात्र पर्यायी मार्ग उपलब्ध नसतानाही कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याने ग्रामस्थ त्यांची मोठी अडचण झाली आहे.
वाशिंबे, पारेवाडी येथील रेल्वे गेटबाबत शिष्टमंडळ खासदार निंबाळकर यांच्या भेटीला

कंत्राटदराने दोन्ही बाजूचे काम केल्यानंतर रेल्वे पटरीवरील आडवा पूल (दादर) करण्यासाठी रेल्वेच्या मेगा ब्लॉक दरम्यान मोठ्या क्रेनच्या साह्याने लोखंडी पूल टाकण्यात आला. रेल्वे उड्डाणपुलाचे पटरीवरील काम पाहण्यासाठी नागरिकांनी रेल्वे स्थानक परिसरात गर्दी केली होती.
पारेवाडी रेल्वे स्थानकावर राहिलेला 13 वर्षांचा मुलगा 12 तासाने पालकांकडे सुखरुप

दरम्यान पारेवाडी रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद केल्याने दुचाकी, चारचाकी वाहने येऊ जाऊ शकत नसल्याने, पर्यायी मार्ग नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, आजारी पेशंट यासह व्यापारीवर्गांना यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी ठेकेदाराने त्वरित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
पारेवाडीकरांचा बदलला मार्ग! रेल्वे गेट बंदचा एसटीला फटका; नागरिकांना १२ किलोमीटरचा वळसा

