करमाळा (सोलापूर) : योग्य पद्धतीने सेंद्रिय शेती केल्यास तोट्यात जात नाही. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कृषीभूषण नामदेव साबळे यांनी केले. तालुक्यातील शेटफळ येथे पंचायत समिती व ग्रामपंचायत यांच्या वतीने ‘सेंद्रिय शेती विषयक कार्यशाळा’ झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे उपस्थित होते.
डॉ. लोणकर यांच्या श्री विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्राचे माजी सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते उदघाटन
साबळे म्हणाले, ‘रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमीनी नापिक होत आहेत. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. अशावेळी शाश्वत उत्पन्न देणारी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.’ ‘सेंद्रिय गूळ व शेळीपालन’ याविषयी त्यांनी माहिती सांगितली. सेंद्रिय शेती तज्ञ कृषीभुषण शिवराम घोडके यांनी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून जनावरांचे मलमुत्र व शेतीमधील टाकावू पदार्थ यापासून खतनिर्मितीचे कारखाने तयार करावेत, असे सांगितले.

कायम दुर्लक्षीत आसणारे उकिरडे ही शेतकऱ्यांची मोठी संपत्ती आसुन यांची जाणीव शेतकऱ्यांना नाही. उकिरड्यावर शास्त्रशुद्धपणे कुजण्याची प्रक्रिया केल्यास एक शेतकरी सात ते आठ टन खत तयार करू शकतो. याचा वापर आपल्या शेतात केल्यास रासायनिक खतांची गरजच भासणार नाही, असे घोडके म्हणाले.

हानुमंत यादव यांनी दवाखान्याकडे जाणारा पैसा वाचवायचा असेल तर विषमुक्त शेती केली पाहिजे असे मत व्यक्त केले. गटविकास अधिकारी राऊत, तालुका कृषी अधिकारी वाकडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ग्रामसेवक सचिन सरडे यांनी केले. बाजार समीतीचे संचालक दादासाहेब लबडे, सरपंच विकास गुंड, उपसरपंच आनंद नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लबडे, बाबूराव चोरगे, महादेव गुंड, काकासाहेब गुंड यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन लटके भाऊसाहेब यांनी तर आभार पत्रकार गजेंद्र पोळ यांनी मानले.

चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजाराम भोंग, कृषी अधिकारी शंकर मिरगणे, विस्तार अधिकारी मनोज महत्रे, अविनाश थोरात, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सुशेन ननवरे, सचिव दादासाहेब केवारे, संजय राऊत, रणजित लबडे, विठ्ठल गुंड, रणजित शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.