युवासेना करमाळा तालुका प्रमुख पदी फरतडे तर शहरप्रमुख पदी परदेशी

करमाळा (सोलापूर) : शिवसेना युवासेनेच्या करमाळा तालुका प्रमुखपदी शंभुराजे फरतडे तर शहर प्रमुख पदी समीर परदेशी यांची निवड झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून या निवडी जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात असून काम बघून सहा महिन्यानंतर कायम करण्यात येतील असे युविसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे. शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावात लवकरच युवासेनेची नव्याने बांधणी करणार असल्याचे नवनिर्वाचित तालुका व शहर प्रमुख यांनी जाहीर केले आहे.

या निवडीबद्दल विभागीय सचिव अक्षय ढोबळे, माढा लोकसभा विस्तारक उत्तम आयवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारीया, संघटक संजय शिंदे, माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण, युवासेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, युवती सेना जिल्हा प्रमुख साक्षी भिसे, उपशहरप्रमुख प्रसाद निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *