करमाळा (अशोक मुरूमकर) : पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक कधी जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीसाठी करमाळा तालुक्यात २ लाख ८ हजार २३ मतदान आहे. (निवडणूक कधी जाहीर होईल त्यानुसार ही संख्या बदलू शकते.) राजकीय नेते मंडळी उमेदवारांची चाचपणी करत असून तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटाचे राजकारण जास्त चालत असल्याने कोणता गट कोणाशी युती- आघाडी करणार याच्या देखील चर्चा सुरु आहेत. त्यात तालुक्यात आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट, बागल गट यांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत.
या निवडणुकीबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आपलं गाव कोणत्या गटात व गणात आहे. कोणत्या गटात किती मतदान आहे. याचा आढावा ‘काय सांगता’ने घेतला आहे. प्रशासनाची देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु असून कधी निवडणुका लागतील याकडे लक्ष लागल्याचे चित्र आहे.
करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीचे १२ गण आहेत. यामध्ये एकूण २ लाख ८ हजार २३ मतदान आहे. त्यात पुरुष १ लाख ९ हजार २१३ व महिला ९८ हजार ८०९ तर इतर १ मतदान आहे.
पांडे गट
एकूण मतदान : ३५ हजार ५५६ (पुरुष १८,६६० व महिला १६,८९६)
रावगाव गण : रावगाव, भोसे, लिंबेवाडी, वडगाव, पुनवर, जातेगाव, खडकी, आळजापूर, कामोणे व मांगी. (एकूण मतदान १७,६११)
पांडे गण : पांडे, खांबेवाडी, धायखिंडी, पोथरे, निलज, बिटरगाव श्री, बोरगाव, घारगाव, पाडळी, पोटेगाव, बाळेवाडी, देवीचामाळ, तरटगाव, दिलमेश्वर व वडाचीवाडी. (एकूण मतदान १७,९४५)
वीट गट
एकूण मतदान : ३३ हजार ७२२ (पुरुष १७,७१७ व महिला १६,००५)
हिसरे गण : करंजे, भालेवाडी, मिरगव्हाण, अर्जुननगर, हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव ह, गौडर, फिसरे, शेलगाव क, सौन्दे (एकूण मतदान १७,५४०)
वीट गण : वीट, मोरवड, देवळाली, खडकेवाडी, गुळसडी, वंजारवाडी, हिवरवाडी, रोशेवाडी, पिंपळवाडी, करमाळा ग्रा. (एकूण मतदान १६,१८२)
कोर्टी गट
एकूण मतदान : ३६ हजार ८७४ (पुरुष १९,२९१ व महिला १७,५८२ व इतर १)
कोर्टी गण : कोर्टी, हुलगेवाडी, गोरेवाडी, कुस्करवाडी, सावडी, कुंभारगाव, घरतवाडी, देलवडी, राजुरी, दिवेगव्हण, भिलारवाडी, कावळवाडी, पोधवडी व विहाळ. (एकूण मतदान १९,३४४)
केत्तूर गण : केत्तूर, गोयेगाव, पारेवाडी, पोमलवाडी, खातगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, जिंती, रामवाडी, भगतवाडी, गुलमवरवाडी व हिंगणी. (एकूण मतदान १७,५३०)
चिखलठाण गट
एकूण मतदान ३२ हजार २८७ (पुरुष १६,९८२ व महिला १५,३०५)
चिखलठाण गण : वाशिंबे, मांजरगाव, उंदरगाव, रिटेवाडी, चिखलठाण, कुगाव, केडगाव व सोगाव. (एकूण मतदान १४,८०८)
उमरड गण : झरे, कुंभेज, वरकटणे, सरफडोह, कोंढेज, उमरड, पोफळज व अंजनडोह. (एकूण मतदान १७,४७९)
वांगी गट
एकूण मतदान ३२ हजार ३०७ (पुरुष १६,९१२ व महिला १५,३९५)
जेऊर गण : जेऊर, जेऊरवाडी, निंभोरे, लव्हे, शेलगाव वा, शेटफळ व दहिगाव. (एकूण मतदान १६,१९६)
वांगी १ गण : वांगी १, वांगी २, वांगी ३, वांगी ४, भिवरवाडी, बिटरगाव वा, सांगवी, ढोकरी, पांगरे, भाळवणी व कविटगाव. (एकूण मतदान १६,१११)
केम गट
एकूण मतदान ३७ हजार २७७ (पुरुष १९,६५१ व महिला १७,६२६)
साडे गण : साडे, नेर्ले, आवाटी, सालसे, घोटी, आळसुंदे, वरकुटे व पाथुर्डी. (एकूण मतदान १९,३८१)
केम गण : केम, सातोली, वडशिवणे, मलवडी व कंदर. (एकूण मतदान १७,८९६)
