करमाळ्यात सापडले ३००० कुणबी मराठा नोंदीचे अभिलेख; महसूल व शिक्षण विभागाकडून सव्वालाख दस्ताची तपासणी

3000 Kunbi Maratha records found in Karmala Inspection of Savvalakh Dasta by Revenue and Education Department

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारने मराठा कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याबाबत संपूर्ण राज्यात युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे. त्या अनुषंगाने करमाळा तालुक्यात आज (शनिवारी) नोडल अधिकारी प्रभारी तहसीलदार विजकुमार जाधव व सहाय्यक नोडल अधिकारी एस. एम. काझी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शोधम सुरु आहे. महसूल व शिक्षण विभागाकडून ही मोहीम सुरु आहे.

करमाळा तालुक्यात महसूल विभागाकडून आज 30 हजार 730 अभिलेख तपासण्यात आले. त्यात 3035 कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत. तर शिक्षण विभागाकडून 1 लाख नोंदी तपासल्या असून त्यात 51 नोंदी सापडल्या आहेत. 4 गावे मोडी लिपीतील तपासणीसाठी पाठवले आहेत, असे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे. वीट, कुंभेज, चिखलठाण व केम येथे मोडी लिपीतील अभिलेख आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांना निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे स्वतः प्रत्येक तहसील कार्यालयात जाऊन मराठा कुणबी पुरावे मदत कक्षास भेट देऊन कक्षाच्या वतीने तपासणी करत असलेल्या अभिलेखाची पाहणी करत आहेत.

महसूल विभागाचे रेकॉर्ड, जन्ममृत्यू नोंदणी रजिस्टर, क, ड, ई पत्रक, सर्व्हे नंबर उतारे या अभिलेखाची तपासणी केली जात आहे. यामध्ये मराठी तसेच मोडी लिपीमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दक्षिण तहसील कार्यालयातील अभिलेख तपासणी पथकाला मराठा कुणबी नोंदी अभिलेखात कशा पद्धतीने तपासव्यात तसेच मोडी लिपीत मराठा कुणबी शब्द कशा पद्धतीने आहे याबाबत माहिती दिली आहे.

तालुक्यात सर्व शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोंदीमध्ये मराठा कुणबी जातीच्या नोंदीचा अधिक गतीने व सूक्ष्मपणे शोध घ्यावा. तसेच नागरिकांनीही त्यांच्याकडे मराठा कुणबी नोंदी असलेली जुने अभिलेखे असतील तर त्याबाबत मदत कक्षास माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *