Nine gram panchayats of Karmala taluka including Bitargaon have been sanctioned Rs 2 crore 15 lakhs for building

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कुकडी प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी योजनेच्या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सिंचन/ बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध होणेसंदर्भात आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे सर्वेक्षणासाठी 47 लक्ष निधीची मागणी केली असून अंदाजे संपूर्ण योजनेच्या पूर्ततेसाठी भूसंपादन, मुख्य पाईपलाईन, पंपहाऊस, पंप इत्यादी कामांसाठी 424 कोटी 94 लाख निधी आवश्यकता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आमदार शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्येच कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती. परंतु त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे तो विषय प्रलंबित होता. महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये आमदार शिंदे यांनी 1 जुलैला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधीची मागणी केली होती.

‘अशी’ असेल कुकडी उजनी उपसा सिंचन योजना
आमदार शिंदे यांची संकल्पनेनुसार प्रस्तावित कुकडी उजनी उपसा सिंचन योजना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून दोन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केली आहे.

टप्पा 1 : रिटेवाडी येथून पाणी उचलून ते मोरवड येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 20.13 किमी आहे त्यासाठी 18 00 मी मी व्यासाच्या 2 समांतर पाईपलाईन व 32 34 अश्वशक्ती क्षमतेचे 8 विद्युत पंप सुचविलेले आहेत. या पहिल्या टप्प्यातील योजनेमधून 18472 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

टप्पा 2 : या टप्प्यात केतुर येथून पाणी उचलून ते सावडी येथील कुकडीच्या अस्तित्वातील कॅनॉलमध्ये टाकले जाईल. हे अंतर 17.60 किलोमीटर असून त्यासाठी 800 मी मी व्यासाची 1 पाईपलाईन सुचविलेली आहे. सदर पाणी उचलण्यासाठी 3100 अश्‍वशक्तीचे 4 विद्युत पंप सुचविलेले आहेत. सदर टप्प्यावरून 5790 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *