आमदार पाटील यांचा ग्रंथालय अध्यक्ष, उपाध्यक्ष व कर्मचाऱ्यांकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यातील ग्रंथालयांसाठी १० लाखाचा निधी दिला आहे. त्याबद्दल त्यांचा चळवळीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रंथपाल यांनी सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. करमाळा तालुक्यातील सर्व ग्रंथालयाला आमदार पाटील यांनी पहिल्याच वर्षात निधी दिला. ही चळवळ बळकट करण्यासाठी त्यांच्या निधीतून १० लाख निधी मंजूर केला. पुढील काळात प्रत्येकवर्षी निधी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रमोद बेरे, संतोष पाटील, डॉ. अशोक शेळके, श्री सरडे, विठ्ठल वरकड, गणेश पवार, श्री. तरंगे, नवनाथ जानकर, दत्तात्रेय घोडके, श्री. ठोंबरे, रामभाऊ गायकवाड, विनोद शिंदे, अशोक पाटील, किरण पाटील, महादेव इंगळे, सोमनाथ गरदडे, भास्कर पवार, श्री आवटे यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कपाट, खुर्ची- टेबल असे साहित्य दिले. यासाठी सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रदीप गाडे यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *