करमाळा (सोलापूर) : सहकार युवक मित्र मंडळच्या वतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर झाले. या शिबिराचा करमाळा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. डोळ्यांशी संबंधित विविध आजारांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. रोहन पाटील, डॉ. अमोल घाडगे, पत्रकार विशाल परदेशी यावेळी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सहकार युवक मित्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्रतपासणी
