करमाळा (सोलापूर) : सहकार युवक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर घेतले. या शिबिराचे उदघाटन करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णा म्हणाल्या, ‘सहकार युवक मित्र मंडळाने घेतलेले रक्तदान शिबिर उल्लेखनीय आहे.’ डॉ. अजयकुमार तोरड म्हणाले, ‘गणेशोत्सवात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम करूनच साजरा केला पाहिजे.’ सामाजिक कार्यकर्ते वर्धमान खाटेर यांनी रक्तदान केले. यावेळी राजुशेठ शियाळ, सुशील कात्रेला, प्रकाश यादव, दिलीप क्षीरसागर, बंडू मुसळे, धीरज सोळंकी, जितेंद्र क्षीरसागर, तुकाराम देशमाने, विकास पवार, सुनील अंधारे, दिनेश देशमाने, सचिन फलके उपस्थित होते.
