करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक सावंत गट शहर विकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी घटकांनाबरोबर घेऊन लढविणार असल्याची माहिती करमाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मनोज गोडसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
गोडसे म्हणाले की, शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सावंत गट करमाळा नगरपालिकेच्या १० प्रभागात २० उमेदवार उभा करणार असून नगराध्यक्षपदासाठी मोहीनी सावंत किंवा चैताली सावंत यांचे उमेदवार म्हणून नाव निश्चित करण्यात येणार आहे. सावंत गट करमाळा शहराच्या विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविणार असुन लवकरच सावंत गटाची बैठक होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली.