करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीच्या १२ गणाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी चार व सर्वसाधारणसाठी सात जागा आरक्षित झाल्या आहेत. उपजिल्हाधिकारी अंजली मरोड या पर्वेक्षण अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. तहसीलदार शिल्पा ठोकडेयांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत झाली.
यामध्ये १) रावगाव गण : अनुसूचित जाती महिला, २) पांडे गण : अनुसूचित जाती सर्वसाधारण, ३) हिसरे गण : सर्वसाधारण, ४) कोर्टी गण : सर्वसाधारण, ५) केत्तूर गण : सर्वसाधारण, ६) साडे गण : सर्वसाधारण, ७) वीट गण : नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, ८) उमरड गण : नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला, ९) जेऊर गण : सर्वसाधारण महिला, १०) वांगी १ : सर्वसाधारण महिला, ११) चिखलठाण गण : सर्वसाधारण महिला, १२) केम गण : नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे आदी उपस्थित होते.
