करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण, गुणवंतांचा सन्मान व गरजूंना दीपावली भेट देण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते.
यावेळी विक्रीकर निरीक्षक महेश तोरमल, अन्न सुरक्षा अधिकारी रोहित लोकरे व पोलिस उपनिरीक्षक अमित लबडे, भारतीय सैनिक अकाश पोळ उपस्थित होते. राऊत म्हणाले, ‘मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम महत्त्वाचे असतात.’ उपस्थितांचे स्वागत ग्रुपचे वैभव पोळ, विजय लबडे, प्रशांत नाईकनवरे, डॉ. सुहास लबडे, प्रमोद मोरे यांनी केले.
प्रास्ताविकात प्रा. सचिन धेंडे यांनी ग्रुपच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. कीर्तनकार विठ्ठल पाटील महाराज, अमित लबडे, रोहित लोकरे, महेश तोरमल, आकाश पोळ यांची भाषणे झाली. भारतीय हँडबॉल संघात निवड झाल्याबद्दल ओंकार लबडे, विधी विषयातून विशेष प्राविण्यासह पदवी मिळवून वकीलीची सनद मिळाल्याबद्दल कन्हैया पाटील, ऑस्ट्रेलियातील हेनबर्ग विद्यापीठात शिक्षणासाठी निवड झालेल्या धीरज व सुरज लावंड यांचा, इजिप्त देशात कंपनी प्रोजेक्टसाठी निवड झालेल्या गौरव गुंड यांचा, वैद्यकीय पदवी मिळवल्याबद्दल सुधीर निंबाळकर यांचा, टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये निवड झाल्याबद्दल ऋषिकेश माने यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हर्षाली नाईकनवरे, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल नानासाहेब साळुंके तसेच सहासी कामगिरीबद्दल मनोज जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गावातील गरजूंना मान्यवरांच्या हस्ते दिवाळी भेट देण्यात आली. कार्यक्रमाला माजी सरपंच मुरलीधर पोळ, आदिनाथचे माजी संचालक सुरेश पोळ, विलास लबडे, राजाभाऊ रोंगे महाराज, बापू महाराज नाईकनवरे, महावीर निंबाळकर, गंगाधर पोळ, राजेंद्र साबळे, वैभव शिंदे, साहेबराव पोळ, पांडूरंग नाईकनवरे, समाधान गुंड, उदयसिंह पाटील, संतोष घोगरे, ॠषीकेश घोगरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले.
