करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोर जाऊ’, असा सूर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा आहे. दरम्यान ‘सर्व पदाधिकाऱ्यांची भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचवली जाईल’, असे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीने आज (रविवार) करमाळा पंचायत समितीच्या १२ व जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल निवास या संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून गट व गणनिहाय इच्छुक उमेदवारांचा आढावा घेतला. तेव्हा महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भावना व्यक्त करण्यात आली.
पाटील म्हणाले, ‘करमाळ्यातील अहवाल वरिष्ठांकडे पाठवला जाईल. इच्छुकांनी गावागावात संपर्क वाढवावा. महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा होईल. स्थानिक पातळीवर काय निर्णय घेईचा. यावरही चर्चा केली जाईल. मात्र राष्ट्रवादीच्या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल’ असेही त्यांनी सांगितले आहे. ‘उमेदवारी देताना त्याची निवडून येण्याची क्षमता पाहिली जाईल. एखाद्या उमेदवाराची ताकद असेल आणि त्याने पक्षात प्रवेश केला तर त्याचा विचार केला जाईल. तेव्हा इच्छुकांनाही समजून घ्यावे’, असेही पाटील म्हणाले आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष भारत अवताडे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल आदी उपस्थित होते.
इच्छुक उमेदवारांची संभाव्य नावे : कोर्टी जिल्हा परिषद गट : डॉ. गोरख गुळवे व ऍड. नितीन राजेभोसले. कोर्टी गण : सुमित गिरंजे, ऍड. नितीन राजेभोसले, ऍड. अजित विघ्ने व वर्षा गुळवे. केत्तूर गण : आरआर बापू साखरे, सुनिल पाटील, शंकर जाधव. चिखलठाण गट : चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील व वामन बदे. चिखलठाण गण : चंद्रकांत सरडे व तानाजी झोळ. उमरड गण : प्रमोद बदे. वीट गट : सिंधुताई खंडागळे व संगीता जगदाळे. हिसरे गण : सुभाष हणपुडे, भरत अवताडे, अमोल फरतडे, रामकृष्ण सांगडे, नानासाहेब नीळ, प्रकाश थोरात व गणेश सरडे. वीट गण : ताराबाई जाधव, वैशाली जाधव व अनिता जाधव.
पांडे गट : स्वाती जाधव पाटील, सुजाता जाधव, अश्विनी बागल व सायली फुंदे. रावगाव गण : प्रियंका पवार, स्नेहल अवचर व हर्षदा पवार. पांडे गण : बबन जाधव, प्रवीण घोडके व सुनील भोसले. केम गट : साधना पवार, सिंधू ननवरे व सुधामती घाडगे. साडे गण : विलास राऊत, मयूर पाटील, दशरथ घाडगे व समाधान दौंड. केम गण : अण्णासाहेब पवार, गोरख पारखे व उमेश इंगळे. वांगी गट : रोहिणी रोकडे व सारिका देशमुख. वांगी गण : सोमनाथ रोकडे, सुहास रोकडे, राजकुमार देशमुख व तात्यामामा सरडे. जेऊर गण : चंद्रहास निमगिरे व दादासाहेब पाटील.
