करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘२०२५- २६ या हंगामात साधणार ११ लाख मे. टन ऊस नोंद आहे. त्यापैकी अंदाजे पावणेचार लाख मे टन ऊस गाळपाची नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांच्या ऊसाला योग्य दर दिला जाईल’, असे आश्वासन बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी आज (मंगळवार) हाळगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे.
हाळगाव येथील श्रीराम शुगर कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रोकडे आलेला आहे. बारामती ऍग्रोच्या माध्यमातून तिसऱ्या गाळप हंगामाचा प्रारंभ झाला. यावेळी आदिनाथचे माजी संचालक किसनराव ढवळे, आदिनाथचे माजी संचालक शहाजी पवार पाटील, आदिनाथचे माजी संचालक शिवाजी ढवळे, राष्ट्रवादीचे संतोष वारे, सोसायटीचे माजी चेअरमन विलास जगदाळे, जामखेडचे माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय वराट, उद्योजक मंगेश आसबे उपस्थित होते.

उपाध्यक्ष गुळवे म्हणाले, ‘हाळगाव येथील कारखान्याकडे परिसरातील साधारण ४० हजार एकर ऊसाची नोंद झाली आहे. गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडावा म्हणून कारखाना प्रशासनाने योग्यरीत्या देखभाल दुरुस्ती केली आहे. शेतकऱ्यांनी चांगला ऊस गाळपासाठी द्यावा. त्वरित पैसे आणि योग्य दर अशी कारखान्याची ओळख आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न येथून केला जात आहे. या हंगामात २४७ ट्रॅक्टर ट्रॉली व ११९ ट्रॅक्टर गाडी अशी यंत्रणा ऊसतोड व वाहतुकीसाठी’, असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना गुळवे म्हणाले, ‘या भागात पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे ऊसाचे प्रमाण जास्त आहे. सभासद व शेतकऱ्यांनी चांगल्या रिकव्हरीचा ऊस देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी चांगला परिपक्व ऊस द्यावा’, असे आवाहन त्यांनी केले. आष्टी, जामखेड, करमाळा, परांडा, कर्जत, खर्डा, जवळा, मिरजगाव, साकत, कोरेगाव, हाळगाव आदी गटातून या कारखान्याकडे ऊस गाळपासाठी येतो.
ऊसाच्या मोळीचे पूजन करून उपस्थित शेतकरी, ऊस वाहतुकदार मान्यवर आदींच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकण्यात आली. कार्यक्रमावेळी उद्योजक अरुण गाडेकर, चौंडीचे सरपंच सुनील उबाळे, दूध डेअरीचे चेअरमन अप्पासाहेब मोहोळकर, माजी सरपंच संतोष निगडे, धांडेवाडीचे माजी सरपंच नितीन धांडे, सामाजिक कार्यकर्ते, राहुल कवादे, गोरख इंगळे, भारत काळे, शरद ढवळे, रावसाहेब ढवळे, अमर चाऊस, रघुनाथ मते, रज्जाक शेख, किरण पवार, बापू ढवळे, जयराम आव्हाड, अमोल बनकर, सचिन नलवडे, धंनजय मोरे, विजय धुमाळ, श्री. डोळे, भारत जाधव, व्हाईस प्रेसिडींट मिलिंद देशमुख, जनरल मॅनेजर संजय घोरपडे, केन मॅनेजर मधुकर मोहिते, चीफ इंजिनिअर बालाजी परबत, चीफ केमिस्ट हेमंत थोरवे आदी उपस्थित होते.
