करमाळा (सोलापूर) : सिद्धार्थनगर- मौलालीमाळ प्रभागातून राजू आव्हाड यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी येथील हिरालाल पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. त्यांच्या पत्नी राणी आव्हाड या प्रभाग 1 मधून नगरसेविका होत्या. त्या बांधकाम समितीच्या सभापती ही होत्या. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी चांगले काम केले होते.
प्रभाग क्रमांक १० (सिद्धार्थनगर- मौलालीमाळ) मध्ये त्यांचे चांगले काम आहे. करमाळा शहरातल्या विविध गटाच्या कार्यकर्त्यांचा त्यांचा चांगला सबंध आहे. पंधरा वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. नवीन पाण्याची टाकी उभारण्याबरोबरच नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. सर्व रहिवाशांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे.
