Video : करमाळा नगरपालिका निवडणुकीची माजी आमदार जगताप यांच्यावर शिवसेनेकडून जबाबदारी! महायुतीचे काय?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शिवसेनेनी (शिंदे गट) करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर दिली आहे. त्यामुळे आता महायुतीचे काय होणार? अशी चर्चा सुरु झाली असून दिग्विजय बागल यांनाही हा राजकीय धक्का असल्याची चर्चा आहे. जगताप यांच्या गटात मात्र या नियुक्तीतमुळे उत्साह वाढला आहे.

करमाळा नगरापलिका निवडणुकीमध्ये जगताप, बागल व सावंत या गटात प्रमुख लढत होईल असे चित्र आहे. येथे पक्षापेक्षा गटाला महत्व असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून समोर जायचा निश्चिय झाला आहे. तर भाजपनिवडणुकीत काहीही झाले तरी नगराध्यक्षपदाचा उमेदवार ‘कमळ’ चिन्हावरच असेल असे जाहीर केले आहे. त्यात शिवसेनेने (शिंदे गट) यांनीही या निवडणुकीत धन्युष्यबाणावर लढण्याचे ठरवले आहे. आता जगताप गटाचे प्रमुख माजी आमदार जयवंतराव जगताप हे शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. आणि पक्षाने त्यांच्यावर जबाबदारीही दिली आहे. यामध्ये जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत बागल गटाचे नेते दिग्विजय बागल हे शिवसेनेचे उमेदवार होते. तर जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांना पाठींबा दिला होता. मात्र पुढे काही दिवसातच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. चिवटे आणि बागल यांच्यात संघर्ष आहे. जगताप यांना पक्षाने दिलेली जबाबदारी हा चर्चेचा विषय झाला असून यामध्ये बागल यांना डावलले असल्याचे बोलले जात आहे. बागल हे एबी फॉर्म आणण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मात्र आता त्यांना एबी फॉर्म मिळतील का? हे पहावे लागणार आहे. दरम्यान या निवडणुकीत ते काय निर्णय घेतील हे देखील पहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *