करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी आज (शनिवार) नगराध्यक्षपदासाठी जगताप (शिवसेना शिंदे गट) गटाकडून महानंदा जयवंतराव जगताप व सावंत गटाकडून मोहिनी संजय सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तर नगरसेवकपदासाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट, बागल गट, सावंत व भाजपच्या ५२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांच्याकडे दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्षपदासाठी दोन व नगरसेवक पदासाठी ५२ असे ५४ अर्ज दाखल झाले आहेत. काही उमेदवारीने डबल अर्ज दाखल केले आहेत. जयदीप शिंदे, इंदू कांबळे, मुकुंद राजुपाध्ये, पल्लवी अंधारे, राजू वाघमारे, रणजित कांबळे, गोपाल वाघमारे, सुनील धाकतोडे, ओंकार ढाळे, अभय महाजन, संजय सावंत, सचिन घोलप, विजयकुमार घोलप, लता घोलप, ज्योती घोलप, विक्रमसिंग परदेशी, सुरेखा जगताप, पुष्पा शिंदे, रवींद्र जाधव, ओंकार चांदगुडे, अमोल फंड, अतुल फंड, जबीन मुलाणी, ज्योती कांबळे, संदीप कांबळे, ज्योतीराम ढाणे, सुजाता ढाणे, किरण बोकन, संतोष सापते, प्रियंका गायकवाड, शोकत नालबंद, वनिता कांबळे, स्वाती माने, संग्राम माने, साधना मंडलिक, अलमुन शेख व विजया जानराव यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
