Video : दोन उमेदवाराला एकच सूचक, एबी फॉर्म व डमी म्हणून दाखल केले करमाळ्यात अर्ज नामंजूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५० उमेदवारांचे २६९ अर्ज दाखल झाले होते. त्यातील २०३ अर्ज मंजूर तर ६६ अर्ज नामंजूर झाले आहेत. अर्जावर उल्लेख केलेल्या पक्षाचा एबी फॉर्म नसणे, डमी म्हणून दाखल केले अर्ज व दोन उमेदवाराला एकच सूचक असणे ही अर्ज नामंजूर होण्याची कारणे आहेत.

करमाळा नगरपालिकेच्या १० प्रभागातून एक नगराध्यक्ष व २० नगरसेवकासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. दाखल झालेल्या अर्जांची आज (मंगळवार) ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन तपसे यांच्या मार्गदर्शनखाली छाननी झाली. यावेळी पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहोत. छाननीवेळी उमेदवारांची परिसरात मोठी गर्दी होती.

नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आठ महिला उमेदवारांचे १५ अर्ज दाखल झाले होते. त्यातील आठ मंजूर तर दोन नामंजूर झाले आहेत. नगरसेवकपदासाठी १४२ व्यक्तींचे २५४ अर्ज आले होते. त्यातील १७ व्यक्तींचे अर्ज नामंजूर झाले आहेत. अर्जावर उल्लेख केलेल्या पक्षाचा एबी फॉर्म नसणे, डमी म्हणून दाखल केले अर्ज व दोन उमेदवाराला एकच सूचक असणे अशी करणे अर्ज नामंजूर होण्याची आहेत.

प्रीतम बडेकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या सूचक गौरी साखरे या रुबीना पठाण यांनीही सूचक होत्या. त्यामुळे त्यांचा दुबार सुचक असल्याचे कारण देत अर्ज नामंजूर झाला आहे. तर चंद्रकांत राखुंडे यांनीही अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज दुबार सूचकामुळे अपात्र ठरला आहे. त्यांना किरण हाके हे सूचक होते. मात्र ते गोपाळ वाघमारे यांनाही सूचक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *