Video : करमाळ्यात जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकणार : आमले

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे करमाळा विधानसभा संपर्कप्रमुख रवी आमले यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. जिल्हा प्रमुख महेश चिवटे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, चंद्रकांत राखुंडे व दिनेश घोलप उपस्थित होते.

करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी आज (बुधवार) पत्रकारांशी संवाद साधला. आमले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्यात शिवसेनेचा मजबूत आहे. एक नगराध्यक्ष व 20 नगरसेवक पदाच्या निवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर उतरली आहे.’ मकाईचे अध्यक्ष दिग्विज बागल यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘गेले ते कावळे आणि राहिलेत ते शिवसेनेचे मावळे. कावळ्यांनी शिवसेनेला काही फरक पडणार नाही’, असा आमले यांचा दावा आहे.

पुढे बोलताना म्हणाले, ’55 शाखा बरखास्त केल्या 20 हजार शिवसैनिकांनी राजीनामा दिला, अशी खोटी माहिती दिली जात आहे. येथील शिवसेना मजबूत आहे. राजीनामा देणारे ५५ शाखाप्रमुख आम्हाला दाखवावेत. दिग्विजय बागल यांच्याकडून याबाबत पक्ष खुलासा मागणार आहे. त्यानंतर पक्ष पुढील कारवाई करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *