करमाळा (सोलापूर) : पुण्याच्याधर्तीवर प्रभागात अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारले जाईल. याशिवाय प्रभागात मूलभूत सुविधा देऊन तरुणांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा व चांगली अभ्यासिका उभारली जाईल. महिला, ज्येष्ठ नागरिक यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. शहराला चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यावर आमचा भर राहणार आहे, असे तारामती क्षीरसागर यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये तारामती क्षीरसागर या भाजपच्या उमेदवार आहेत. त्या करमाळा अर्बन बँकेच्या संचालिका म्हणून काम पाहत आहेत. त्यांचे महिलाश्रम हायस्कुल कर्वेनगर, पुणे येथून ११ वी पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे पती रामचंद्र क्षीरसागर हे पदवीधर आहेत. त्यांना चार मुलं आहेत. त्यांची एक नात डॉक्टर आहे. तर दोघी BAMS व आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. त्यांचा थोरला मुलगा प्रकाश क्षीरसागर हे करमाळा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते देवी यांचे विश्वासू आहेत. शांत, संयमी व सुशिक्षित कुटूंब अशी या कुटुंबीयांची ओळख आहे. अडचणीच्या काळात ते सर्वांच्या मदतीला धावून येतात. त्यांचे आजे सासरे कै. दगडू दीनानाथ क्षीरसागर हे माजी नगरसेवक होते.
गुजर गल्ली येथील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या संतांच्या जयंती उत्सहात, पारायण सोहळ्यात त्यांचा मोठा सहभाग असतो. ज्ञानेश्वरी वाचन सोहळ्यात त्या प्रमुख असतात. सामाजिक कामातून त्या महिला व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. प्रभागातील सरकारी रुग्णालय सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्या सरकारकडे पाठपुरावा करणार आहेत.
काय केले जाणार?
क्षीरसागर म्हणाल्या, ‘प्रभागात रस्ते, गटार, सांडपाणी टाकी बांधणे, महिला सक्ष्मीकरण व त्यांचे आरोग्य यावर काम केले जाणार आहे. प्रभागातील प्रत्येकाच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक घर स्वालंबी व आर्थिक सक्ष्म व्हावे म्हणून प्रभागात रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका व तरुणांसाठी व्ययामशाला उभारण्याचा मानस आहे. बालकांचे आरोग्य सदृढ व्हावे म्हणून त्यांचे लसीकरण व इतर सुविधा पुरवल्या जातील. त्यांच्यासाठी उद्यान उभारण्याचा मानस आहे.’
महिलांसाठी काय?
पुण्याच्या धर्तीवर प्रभागात अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. प्रभागात महिला भवन उभारून अत्याधुनिक व्यायामशाळा उभारली जाणार आहे. त्यांचे आरोग्य चांगले रहावे व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना प्रक्षिशण दिले जाणार आहे. गणेशोत्सवात सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. नंदन प्रतिष्ठानच्या मार्फत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभाग असतो. हभप अंजली अभंग यांचे कीर्तन घेण्यात आले होते.
प्रभागातील समस्या
प्रभागात सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शुद्ध आणि नियमित पाणी मिळत नाही, स्वच्छता केली जात नाही. कचरा उचलला जात नाही. यापुढे आमच्याकडून नियमित पाणी पुरवठा व स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे.
धूळमुक्त प्रभाग
प्रभागातील रस्ते व स्वच्छता ही कामे नियमित करून प्रभाग धूळमुक्त केला जाणार आहे. त्यामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न तयार होतात. मात्र चांगले काम करून नागरिकांना स्वच्छ व शुद्ध हवा मिळावी म्हणून प्रयत्न केला जाईल. नागरिकांसाठी एक उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारले जाईल. सर्वधमीयांसाठी सभागृह उभारले जाईल.
एक खिडकी योजना
प्रभागातील नागरिकांना तत्काळ आणि त्वरित सरकारच्या योजनाचा लाभ घेता यावा, लाभार्थीना सरकारची मदत मिळावी यासाठी जनजागृती करून सुलभता आणि तत्पर सेवा मिळावी म्हणून प्रभागातच एक खिडकी योजनेप्रमाणे उपक्रम राबविला जाईल.
निधी मिळवण्यासाठी काय?
क्षीरसागर म्हणाल्या, ‘केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विकास निधी मिळेल. त्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आमचे नेते कन्हैयालाल देवी, भाजपच्या नेत्या रश्मी बागल, मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून निधी मिळवला जाईल. करमाळा शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक आहे मतदारांनी विकासासाठी आम्हाला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.’
