सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲड. अखिल शाक्य यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनी हा प्रवेश केला. सोलापूर शहर व जिल्ह्यात सामाजिक, राजकीय व कायदेशीर क्षेत्रात सातत्याने ते कार्यरत असतात.
शिवसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश झाल्याचे अखिल शाक्य यांनी स्पष्ट केले. सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीला हा धक्का मानला जात आहे. ॲड. शाक्य यांनी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केल आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 अनुसूचित जाती या आरक्षित जागेसाठी ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याच सांगितले आहे. आगामी काळात आपली कार्यपद्धती 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या मूळ विचारधारेवर आधारित राहील, असेही त्यांनी नमूद केले.या प्रवेशामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, अशी प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
