करमाळा (अशोक मुरूमकर) : संगोबा येथील श्री संगमेश्वर विद्यालयामध्ये सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र संघटनेच्या वतीने प्रशालेस साऊड सिस्टीम संच देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार शिल्पा ठोकडे उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा संघचालक डॉ. रमेश सिद्ध, पंढरपूर सेवा भारतीचे (जिल्हा उपाध्यक्ष) राजेंद्र लाड, प्रांताचे सामाजिक आयाम व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सदानंदजी कुलकर्णी, श्रीकृष्ण पाटील, प्रतीक गोरे, प्रसन्न कुलकर्णी, अकलू गायकवाड, अर्जुन शेळके, प्रसन्नता कुलकर्णी, संग्राम परदेशी, मनोज कुलकर्णी, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, देवस्थानचे पुजारी गहिनाथ गायकवाड, मुख्याध्यापक सुनील शिंदे आदी उपस्थित होते. प्रशालेस ग्लास बोर्ड, खेळाचे मैदान व स्वच्छतागृहाचे काम करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
सेवा भारती संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने 565 प्रकल्प प्रकल्प सेवा सुरु आहेत. सेवा भारती चार आयामांमध्ये स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य व सामाजिक या क्षेत्रामध्ये सामाजिक सेवा करत आहेत. सोलापूर जिल्हामध्ये १९ ठिकाणी फिरती विज्ञान प्रयोग शाळा, १५ किशोरी विकास प्रकल्प, असे उपक्रम चालवले जातात. यावेळी तहसीलदार ठोकडे, सिद्ध व सदानंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन किरण भागडे यांनी तर आभार हनुमंत चांदणे यांनी मानले.
