2012 पासून रखडलेला कामोणे- पोथरे हा पाच किलोमीटरचा रखडलेला शिव रस्ता तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी खुला करून दिला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीवर या रस्त्याची पाहणी करून रस्ता खुला करू, असे अनेकदा नागरिकांना अश्वासन मिळाले होते. मात्र तहसीलदार ठोकडे यांनी यामध्ये लक्ष घालून खुला करून दिला आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी ‘धन्यवाद तहसीलदार मॅडम’ असे स्टेट्स ठेवले आहेत.
कामोणे- पोथरे शीव अनेक दिवसांपासून रखडला होता. अनेकदा फक्त कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जात होती. मात्र त्यातून शेतकाऱ्यांच्या अडचणी वाढत होत्या. कोरोना काळात अधिकारी पाहणी करण्यासाठी येत नव्हते आणि शेतकऱ्यांच्या आशा धुसर होत होत्या. त्यामुळे प्रशासनावर शेतकरीही नाराज झाले होते. लालपितीतील या कारभारामुळे आपल्याला आता न्याय भेटणार नाही अशी भावना शेतकऱ्यांची झाली होती. मात्र अशा स्थितीत तहसीलदार ठोकडे या देवदूत ठरल्या आहेत.
तहसिलदार ठोकडे यांनी ३१ डिसेंबरला प्रत्यक्ष येऊन शिवरसत्याची पाहणी केली. आणि ७ जानेवारीला हा रस्ता खुला केला केला. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे एक नव्हे तर दोन गावच्या शेतकऱ्यांचा विषय मिटला आहे. त्यामुळे पोथरे व कामाणे येथील शेतकऱ्यांनी तहसिलदार ठोकडे यांचे आभार मानले असून धन्यवाद तहसीलदार मॅडम अशा आशयाचे स्टेट्स अनेकांनी ठेवले आहेत.
पोथरे- कामोणे शिवरस्त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. रखडलेला हा रस्ता काही शेतकऱ्यांनी ३०० मीटर आडवलेला होता. या संदर्भाची रस्ता केस सुरू होती. तीसऱ्याच स्थळ पाहणी दरम्यान आठच दिवसात ठोकडे यांनी रस्ता खुला करून देण्यांचे आश्वासन दिले आणि कामही सुरु केले. या रस्त्यासाठी अनेकांनी पाठपुरावा केला आहे.
