करमाळा : करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या १२ गणात विजयी मिळवण्यासाठी भाजपचे बागल व राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी आमदार संजयमामा शिंदे एकत्र आले आहेत. संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केल्यानंतर आता ते एकत्रित करमाळा तालुक्यात दौरा करणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने शिंदे व बागल यांची करमाळ्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत युती झाली आहे. या युतीमुळे करमाळ्यात महायुतीचे बळ वाढले आहे. कार्यर्कत्यांमध्ये एकत्र आल्याचा संदेश जावा व विकासासाठी सर्व उमेदवार विजयी व्हावेत म्हणून माजी आमदार संजयमामा शिंदे व भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल हे एकत्रित गण भेट दौरा करणार आहेत.
रविवारी (ता. २५) सकाळी 9 वाजता देलवडी येथे बागल व शिंदे एकत्रित भेट देणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता वीट येथील गौतम जगदाळे यांच्या वस्तीवर ते भेट देणार आहेत. दुपारी 4 वाजता बोरगाव येथे व सायंकाळी 6 वाजता
रावगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.
