मोहिते पाटील समर्थकांच्या बैठकीत काय ठरलं?

करमाळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात मोहिते पाटील समर्थकांची बैठक झाली आहे. डॉ. अमोल घाडगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला कोर्टी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सवितादेवी राजेभोसले, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस संतोष वारे, केम पंचायत समिती गणाचे उमेदवार अमरजित साळुंखे यांच्यासह निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत काय रणनीती ठरली आहे हे अद्याप समजलेले नाही. मात्र सर्व उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (ता. २७) मुदत आहे. तोपर्यंत त्यांच्यात काय निर्णय होणार का हे पहावे लागणार आहे. आमदार नारायण पाटील व मोहिते पाटील यांच्यात वेगळे पॅनल झाले असल्याने या बैठकीला विशेष महत्व आहे. आमदार पाटील गटाचे उमेदवार हे करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून तर मोहिते पाटील समर्थक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *