वडगाव येथील अंबादास भांडवलकर यांचे वृद्धापकाळाने निधन

करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांचे वडील अंबादास रामचंद्र भांडवलकर (वय ९६) यांचे शनिवारी (ता. २१) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्यावर शनिवारी रात्री 8:15 वाजताच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, चार सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून अनेक दिवस काम पाहिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *