जेऊर ग्रामपंचायत इमारत आमदार पाटलांची खाजगी मालमत्ता आहे काय? : विवेक येवले

करमाळा (सोलापूर) : जेऊर ग्रामपंचायत इमारत आमदार नारायण पाटील यांची खाजगी मालमत्ता आहे काय? गेली कित्येक वर्षे या मूळ इमारतीचा उपयोग खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे त्यांच्याकडून केला जातो आहे, असा आरोप माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक विवेक येवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

आमदार पाटील यांच्याकडून जेऊर ग्रामपंचायतचा खाजगी मालमत्ताप्रमाणे वापर सुरु आहे. त्यांनी येथे आपले संपर्क कार्यालय करुन कब्जा केलेला आहे? केवळ त्यांच्या सोयीसाठी आवारात नवीन इमारत बांधून ग्रामपंचायत व ग्रामसेवक कार्यालय तिथं अनेक वर्षांपासून स्थलांतरित केलेलं आहे. पाटलांना ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मालकीच्या इमारतीचा खुलेआम वापर करताना कुठल्याही निवडणुकीची आचासंहिता लागू होत नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे. आमदार पाटील हे त्याचं कार्यालयात बसून विविध विभागांच्या अधिकाऱ्याना, कर्मचाऱ्यांना बोलावून आढावा बैठका घेतात, असेही त्यांनी म्हटले आहे. याकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आदी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी येवले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *