Photo : करमाळा पोलिस ठाण्यात स्वच्छता मोहीम

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या संकल्पनेतून आज (बुधवार) सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला. स्वतः पोलिस निरीक्षक माने हे देखील यामध्ये सहभागी होऊन स्वच्छता करण्यासाठी मदत करत होते.

‘पोलिस ठाणे व परिसर स्वच्छ रहावा यासाठी नेहमीच प्रयत्न असतो. परिसर स्वच्छ राहिला तर काम करण्यासही प्रसन्न वाटते. त्यामुळे स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. पोलिस ठाणे स्वच्छ रहावे व आपल्यालाही स्वच्छतेची सवय असावी म्हणून आम्ही एकत्रित येऊन परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न असतो. दैनंदिन कामातील थोडावेळ परिसर स्वच्छ करण्यासाठी देत असतोत’, असे पोलिस निरीक्षक माने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *